ठाण्यात राजकीय वातावरण तापले, शिंदे-ठाकरे गटात हाणामारी #5मोठ्याबातम्या

शिंदे
Published

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आलेल्या महत्त्वाच्या बातम्या

1. ठाण्यात राजकीय वातावरण तापले, शिंदे-ठाकरे गटात हाणामारी

 माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे व्हीव्हीयाना मॉलमध्ये जाणे, त्यानंतर त्यांना अटक होऊन झालेली जामीन, पुन्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची ठाणे जिल्ह्यात विकासकामांची उद्घाटने, भाषणं, त्यापाठोपाठ आव्हाड यांच्यावर दाखळ झालेला विनयभंगाचा गुन्हा यामुळे ठाण्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. 

आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांच्यावळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शनं केली.

आता आव्हाड यांचे कुटुंबीयही यामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

याच राजकीय घडामोडींमध्ये आता नवी घटना काल 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध आणि त्यानंतर मारामारी झाल्याचे एका व्हीडिओतून दिसून आले आहे.

ही घटना किसननगर येथे घडली आहे.

 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले होते.

त्यावेळेस हे घोषणायुद्ध आणि हाणामारी झाली.

त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात जमले आणि तेथे राज्य राखीव दलासह पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली. 

लोकसत्ताने प्रकाशित केलेल्या व्हीडिओमध्ये ही मारामारी दिसून येते.  

2. सीएए लागू होणारच- अमित शाह 

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार आहे, तसंच समान नागरी कायदाही येईल, असं स्पष्ट वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ' न्यूज 18 इंडियाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

 याबद्दलची बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे. 

अमित शाह म्हणाले, “1950 पासून आमच्या सगळ्या घोषणापत्रांमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत लिहिलं आहे. संविधान सभेनेही देशाची संसद आणि विधिमंडळ अनुकूल असेल तेव्हा समान नागरी कायदा आला पाहिजे, असं स्पष्ट सांगितलं आहे.

नेहरू, पटेल, मौलाना आझाद यांच्या सह्या यावर आहेत, मग तेपण सांप्रदायिक आहेत का? 1967 नंतर तुम्ही सांप्रदायीक विचार सुरू केलात.” 

सीएएबद्दल ते म्हणाले, “आमच्या राज्यात कोणालाही स्पेशल फेवर दिला जात नाही. जस्टीस फॉर ऑल अपिजमेंट फॉर नन, हे आमचं धोरण आहे. कोणावर अन्याय करणार नाही, कुणाचं लांगुलचालन करणार नाही,'  सीएए देशाचा कायदा आहे, कोरोनामुळे सीएए लागू करायला उशीर झाला, कोरोनाची स्थिती ठीक आहे. सीएए लागू होणार हे निश्चित.” 

3. हरहर महादेव चित्रपटाबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटणार- संभाजीराजे

 संभाजीराजे छ्त्रपती यांनी हरहर महादेव या सिनेमाबाबत पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सिनेमाबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 

टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “ शिवाजी महाराजांनी अफजलखानाला हिरण्यकश्यपूप्रमाणे मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढला असे दाखवण्यात आले. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहेत, परंतु चित्रपटात शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवताराप्रमाणे दाखवले आहे.

 संभाजीराजे छ्त्रपती यांनी हरहर महादेव या सिनेमाबाबत पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सिनेमाबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

 संभाजीराजे छ्त्रपती यांनी हरहर महादेव या सिनेमाबाबत पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सिनेमाबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 

टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “ शिवाजी महाराजांनी अफजलखानाला हिरण्यकश्यपूप्रमाणे मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढला असे दाखवण्यात आले. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहेत, परंतु चित्रपटात शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवताराप्रमाणे दाखवले आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती होते त्यांनी असामान्य असे कार्य केले असे संभाजीराजे म्हणाले.  शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत त्या दाखवता येतील पण असे चित्रीकरण दाखवणे चुकीचे आहे.

सेन्सॉर बोर्डाने अशा चित्रपटाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल करत सेन्सॉर बोर्डाकडे आम्ही मागणी केली आहे की, एक ऐतिहासिक चित्रपटासंबंधित एक समिती नेमावी. यासंबंधित मी 16 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात जे चाललेले आहे ते अशोभनीय आहे.” 

4.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एक आमदाराचा राजीनामा 

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा दिला आहे.

कंधाल जडेजा असं त्यांचं नाव आहे.  ते दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेत निवडून गेले होते. आता त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

 झी 24 तासने दिलेल्या बातमीनुसार, ‘जडेजा हे गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर जडेजा यांनी सपाकडून कुटियाना या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

जडेजा हे 2012 आणि 2017 अशा एकूण 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुटियानातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र ही जागा यंदा काँग्रेसच्या वाट्याला गेली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत आहे.” 

 5. सक्तीच्या धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका- सर्वोच्च न्यायालय

धर्मांतर आणि सक्तीने केले जाणारे धर्मांतर याबाबत भारतात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सक्तीच्या धर्मांतराबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही टीप्पणी नोंदवली आहे. 

याबाबत लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, “सक्तीचे धर्मांतर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकते आणि नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरही गदा आणू शकते, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याबरोबरच हा ‘अत्यंत गंभीर’ प्रश्न हाताळण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.

फसवणूक, प्रलोभनाद्वारे आणि धमकावून धर्मांतर करण्याचे प्रकार रोखण्यात अपयश आले तर ‘अत्यंत कठीण परिस्थिती’ उद्भवेल असा इशाराही न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने दिला.” 

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)