मृत्यूनंतर प्रेमीयुगुलाच्या पुतळ्यांचं लग्न का लावण्यात आलं?
मृत्यूनंतर प्रेमीयुगुलाच्या पुतळ्यांचं लग्न का लावण्यात आलं?
Published
गुजरातच्या तापी जिल्ह्यातल्या निझर तालुक्यात या पुतळ्यांचं लग्न झालंय. पारंपरिक आदीवासी प्रथेनुसार हा लग्न सोहळा पार पाडला. निझर तालुक्यातल्या नेवाळा गावातल्या गणेश पाडवी आणि रंजना पाडवी या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, लग्न होऊ न शकल्याने त्या दोघांनीही आत्महत्या केली. त्यांची ती अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या लग्नाचा सर्वानुमते निर्णय घेतला. यासाठी त्या दोघांचे हुबेहूब पुतळे बनवले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पुतळ्यांचं लग्न लावलं.





