नदीपात्रात लाखो मृत माशांचा खच, कारण नेमकं काय?

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सच्या मेनिंडी गावातील नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदीतील मासे मृत्यूमुखी पडले आहेत.
शुक्रवारी सकाळी डार्लिंग-बाका नदीवर मोठ्या प्रमाणात मृत माशांचा मृत माशांचा खच पडला होता.
यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात साफ सफाईचं काम सुरू करण्यात आलं आहे.
राज्याच्या नदी प्राधिकरणाने म्हटलंय की, उष्णतेच्या लाटेमुळे डार्लिंग-बाका नदीवर परिणाम होत आहे.
स्थानिकांचं म्हणणं आहे की, काठावर नदीतील लाखो मृत माशांचा खच पडला आहे. मागच्या तीन वर्षांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती.
एनएसडब्ल्यू डिपार्टमेंट ऑफ प्राइमरी इंडस्ट्रीज (डीपीआय) ने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, उष्णतेच्या लाटेमुळे नदी प्रणालीवर अधिक ताण पडतो. यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे."
सध्याच्या काळात मानव-प्रेरित हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढत आहे. या लाटा अधिक तीव्र आणि मोठ्या काळासाठी टिकून राहतात. औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून तापमानात आधीच 1.1 अंशाने वाढ झाली आहे. आणि जोपर्यंत उद्योगातून निर्माण होणारं उत्सर्जन कमी होत नाही तोपर्यंत तापमान वाढतच राहील.
मेनिंडी शहरातील ग्रॅमी मॅकक्रॅब बीबीसीशी बोलताना सांगतात, माशांच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर आहे.

ते पुढे म्हणाले की, "येथून पुढे या घटनांचा जरा जास्तच सामना करावा लागेल. आधीच कुजलेल्या माशांनी पाण्यातून जास्त ऑक्सिजन शोषल्यामुळे आणखी मासे मरतील असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केलाय."
न्यू साउथ वेल्सच्या मेनिंडी गावात सुमारे 500 लोक राहतात. मरे डार्लिंग बेसिनचा ही ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी नदी प्रणाली असून डार्लिंग-बाका नदी याचाच एक भाग आहे.
एनएसडब्ल्यू डिपार्टमेंट ऑफ प्राइमरी इंडस्ट्रीजने म्हटल्याप्रमाणे, माशांच्या मृत्यूमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
"तुमच्या स्वयंपाकघरात एखादा मासा सडला असेल आणि तुमचे दारं खिडक्या बंद असतील, घरात एअर कंडिशनर नसेल तर विचार करा घरात किती दुर्गंधी येईल. आणि आमच्या नदी काठावर तर लाखो सडलेले मासे आहेत."
शनिवारी मेनिंडी येथील तापमान 41 अंशांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती.
ते पुढे म्हणाले की, स्थानिक लोक पाणीपुरवठ्यासाठी डार्लिंग-बाका नदीवर अवलंबून आहेत. आम्ही नदीचं पाणी धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी वापरतो. पण आता लोक त्यांच्या या मूलभूत गरजांसाठी देखील ते पाणी वापरू शकणार नाहीत.
माशांच्या मृत्यूमुळे मरे डार्लिंग बेसिनच्या समस्या पुढे आल्या आहेत. दुष्काळ आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे मरे डार्लिंग इकोसिस्टमवर विपरीत परिणाम झाला आहे.
मरे डार्लिंग बेसिन प्राधिकरणाने म्हटलंय की, शेती, उद्योग आणि स्थानिकांच्या वाढत्या पाणी वापरामुळे नदीतील पाण्याचा ओघ आटला आहे.
शिवाय, हवामानातील घटनांचाही या नदी प्रणालीवर परिणाम झालाय. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आग आणि दुष्काळ या दोन्हीसाठी ही प्रणाली असुरक्षित ठरत आहे.
नदी आटू नये आणि ती पुन्हा एकदा प्रवाही व्हावी यासाठी 2012 मध्ये 13 बिलियन रुपयांची योजना आणण्यात आली होती.
एनएसडब्ल्यू डिपार्टमेंट ऑफ प्राइमरी इंडस्ट्रीजने म्हटलंय की, माशांच्या मृत्यूमागील मूळ कारण शोधण्यासाठी आम्ही फेडरल एजन्सीसोबत काम करू.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























