फक्त एका टोळकिड्यामुळे संकट कसं येऊ शकतं?
टोळधाडीमुळे आफ्रिकेतील अनेक देशांमधील पिकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन लोकांंचं आयुष्यच धोक्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षांमधील हा सर्वात मोठा प्रादुर्भाव आहे. पण ही अशी भयंकर स्थिती का निर्माण झाली?
वाळवंटी टोळ ही टोळांची प्रजाती साधारणतः निर्जन प्रदेशात आढळते. अंड्यातून बाहेर पडून त्याचा टोळकिडा होतो आणि त्याला पंख फुटतात.
मात्र कधीकधी हे टोळकिडे भयंकर ठरतात. एखाद्या हिरव्यागार प्रदेशात ते एकत्र येतात तेव्हा त्यांचं एकट्यादुकट्याचं अस्तित्व संपतं आणि एकत्र मिळून ते नुकसान करतात.
अशा स्थितीत ते आपला रंग बदलतात आणि त्यांची टोळधाड तयार होते.
या टोळधाडी प्रचंड असू शकतात. त्यामध्ये 10 अब्ज टोळही असू शकतात. एका दिवसात ते 200 किमी लांब अंतर कापू शकतात. सतत खाणारे आणि प्रजनन करणारे हे टोळ त्या प्रदेशातील पिकं एका दिवसात नष्ट करू शकतात.
संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या (FAO) माहितीनुसार साधारणपणे 2500 लोकांना वर्षभरात जितकं धान्य लागतं तितकं धान्य एक टोळधाड संपवू शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2003-05 या काळातही टोळांच्या संख्येत अशीच वाढ झाली होती. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील पिकांचं अडीच अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
1930,1940 आणि 1950 या काळातही टोळांची संख्या वाढली होती. काही टोळधाडी तर इतक्या मोठ्या प्रदेशावर पसरल्या, की त्याला 'आपत्ती' म्हणून घोषित करावं लागलं
FAO च्या माहितीनुसार टोळांची ही प्रजाती जगातील एक दशांश लोकांना प्रभावित करते. त्यामुळे त्यांना जगातील सर्वात जास्त धोकादायक स्थलांतरित प्रजाती म्हटले जातात.
वाळवंटी टोळ ही टोळांची प्रजाती साधारणतः निर्जन प्रदेशात आढळते. अंड्यातून बाहेर पडून त्याचा टोळकिडा होतो आणि त्याला पंख फुटतात.
मात्र कधीकधी हे टोळकिडे भयंकर ठरतात. एखाद्या हिरव्यागार प्रदेशात ते एकत्र येतात तेव्हा त्यांचं एकट्यादुकट्याचं अस्तित्व संपतं आणि एकत्र मिळून ते नुकसान करतात.
अशा स्थितीत ते आपला रंग बदलतात आणि त्यांची टोळधाड तयार होते.
या टोळधाडी प्रचंड असू शकतात. त्यामध्ये 10 अब्ज टोळही असू शकतात. एका दिवसात ते 200 किमी लांब अंतर कापू शकतात. सतत खाणारे आणि प्रजनन करणारे हे टोळ त्या प्रदेशातील पिकं एका दिवसात नष्ट करू शकतात.
संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या (FAO) माहितीनुसार साधारणपणे 2500 लोकांना वर्षभरात जितकं धान्य लागतं तितकं धान्य एक टोळधाड संपवू शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2003-05 या काळातही टोळांच्या संख्येत अशीच वाढ झाली होती. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील पिकांचं अडीच अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
1930,1940 आणि 1950 या काळातही टोळांची संख्या वाढली होती. काही टोळधाडी तर इतक्या मोठ्या प्रदेशावर पसरल्या, की त्याला 'आपत्ती' म्हणून घोषित करावं लागलं
FAO च्या माहितीनुसार टोळांची ही प्रजाती जगातील एक दशांश लोकांना प्रभावित करते. त्यामुळे त्यांना जगातील सर्वात जास्त धोकादायक स्थलांतरित प्रजाती म्हटले जातात.
| वर्ष | मंदी | वाढ आणि घट | आपत्ती |
| 2019 | 0 | 18 | 0 |
| 2018 | 0 | 0 | 0 |
| 2017 | 0 | 0 | 0 |
| 2016 | 5 | 0 | 0 |
| 2015 | 2 | 0 | 0 |
| 2014 | 7 | 0 | 0 |
| 2013 | 10 | 0 | 0 |
| 2012 | 9 | 0 | 0 |
| 2011 | 7 | 0 | 0 |
| 2010 | 4 | 0 | 0 |
| 2009 | 5 | 0 | 0 |
| 2008 | 8 | 0 | 0 |
| 2007 | 13 | 0 | 0 |
| 2006 | 1 | 0 | 0 |
| 2005 | 0 | 20 | 0 |
| 2004 | 0 | 23 | 0 |
| 2003 | 5 | 0 | 0 |
| 2002 | 0 | 0 | 0 |
| 2001 | 0 | 0 | 0 |
| 2000 | 2 | 0 | 0 |
| 1999 | 4 | 0 | 0 |
| 1998 | 7 | 0 | 0 |
| 1997 | 12 | 0 | 0 |
| 1996 | 15 | 0 | 0 |
| 1995 | 15 | 0 | 0 |
| 1994 | 13 | 0 | 0 |
| 1993 | 20 | 0 | 0 |
| 1992 | 5 | 0 | 0 |
| 1991 | 0 | 0 | 0 |
| 1990 | 3 | 0 | 0 |
| 1989 | 0 | 15 | 0 |
| 1988 | 0 | 0 | 26 |
| 1987 | 15 | 0 | 0 |
| 1986 | 12 | 0 | 0 |
| 1985 | 2 | 0 | 0 |
| 1984 | 0 | 0 | 0 |
| 1983 | 7 | 0 | 0 |
| 1982 | 5 | 0 | 0 |
| 1981 | 5 | 0 | 0 |
| 1980 | 6 | 0 | 0 |
| 1979 | 0 | 4 | 0 |
| 1978 | 0 | 15 | 0 |
| 1977 | 3 | 0 | 0 |
| 1976 | 9 | 0 | 0 |
| 1975 | 7 | 0 | 0 |
| 1974 | 11 | 0 | 0 |
| 1973 | 7 | 0 | 0 |
| 1972 | 5 | 0 | 0 |
| 1971 | 4 | 0 | 0 |
| 1970 | 7 | 0 | 0 |
| 1969 | 0 | 11 | 0 |
| 1968 | 0 | 25 | 0 |
| 1967 | 7 | 0 | 0 |
| 1966 | 2 | 0 | 0 |
| 1965 | 4 | 0 | 0 |
| 1964 | 6 | 0 | 0 |
| 1963 | 0 | 10 | 0 |
| 1962 | 0 | 29 | 0 |
| 1961 | 0 | 29 | 0 |
| 1960 | 0 | 0 | 44 |
| 1959 | 0 | 0 | 47 |
| 1958 | 0 | 0 | 41 |
| 1957 | 0 | 0 | 37 |
| 1956 | 0 | 0 | 35 |
| 1955 | 0 | 0 | 43 |
| 1954 | 0 | 0 | 40 |
| 1953 | 0 | 0 | 43 |
| 1952 | 0 | 0 | 27 |
| 1951 | 0 | 41 | 0 |
| 1950 | 0 | 33 | 0 |
| 1949 | 9 | 0 | 0 |
| 1948 | 12 | 0 | 0 |
| 1947 | 0 | 29 | 0 |
| 1946 | 0 | 36 | 0 |
| 1945 | 0 | 0 | 42 |
| 1944 | 0 | 0 | 47 |
| 1943 | 0 | 0 | 43 |
| 1942 | 0 | 0 | 35 |
| 1941 | 0 | 24 | 0 |
| 1940 | 0 | 6 | 0 |
| 1939 | 5 | 0 | 0 |
| 1938 | 3 | 0 | 0 |
| 1937 | 6 | 0 | 0 |
| 1936 | 6 | 0 | 0 |
| 1935 | 6 | 0 | 0 |
| 1934 | 0 | 9 | 0 |
| 1933 | 0 | 18 | 0 |
| 1932 | 0 | 0 | 27 |
| 1931 | 0 | 0 | 35 |
| 1930 | 0 | 0 | 45 |
| 1929 | 0 | 0 | 41 |
| 1928 | 0 | 0 | 34 |
| 1927 | 0 | 22 | 0 |
| 1926 | 0 | 8 | 0 |
| स्रोतः FAO | |||
| टीपः मंदीचा अर्थ टोळांची संख्या कमी होण. वाढ म्हणजे पुनरुत्पादनामुळे टोळांच्या संख्येत झालेली वाढ. आपत्ती म्हणजे एका वर्षाहून जास्त काळ झालेला टोळधाडीचा प्रसार आणि घट म्हणजे टोळधाडीचं संकट संपुष्टात येणे. | |||
पूर्व आफ्रिका आणि पाकिस्तानातील पिकं टोळ नष्ट करत आहेत.
सध्या हॉर्न ऑफ आफ्रिकेत आलेली टोळधाड गेल्या काही दशकांमधील सर्वात मोठी टोळधाड आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकं नष्ट होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत आहे.
सोमालिया आणि इथिओपियामधल्या पिकांचा फडशा पाडल्यानंतर हे टोळ केनियातली पिकं फस्त करत आहेत. केनियातली गेल्या 70 वर्षांमधली तर सोमालिया आणि इथिओपियातली गेल्या 25 वर्षांमधली ही सर्वात मोठी टोळधाड आहे.
सोमालियानं या टोळधाडीला राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलं आहे. यापुर्वी पाकिस्ताननंही असं पाऊल उचललं होतं. पाकिस्तानात गहू, कापूस, मका आणि इतर पिकांवर टोळांनी हल्ला केला होता.
मात्र FAO च्या म्हणण्यानुसार सध्याची टोळधाड अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे कारण जून महिना येईपर्यंत त्यांची संख्या 500 पट वाढण्याची शक्यता आहे.
टोळधाडीबद्दल अलर्ट घोषित करणारे देश
टोळधाडींच्या काही समूहांनी रविवारी युगांडामध्ये प्रवेश केला. जर त्यांना आळा घातला नाही तर ही टोळघाड या प्रदेशात प्लेगसदृश परिस्थिती ओढवू शकते, अशी भीती संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी परिषदेने व्यक्त केली आहे.
डिसेंबर संपेपर्यंत टोळधाडीनं सोमालिया आणि इथिओपियामधील 1,75,000 एकर शेतीचं नुकसान केलं आहे.
FAOच्या माहितीनुसार, ही टोळधाड एका दिवसात 350 चौकिमी प्रदेशातील 8 टन वजनाच्या वनस्पती संपवत आहेत.
यातल्या एका टोळधाडीनं केनियामध्ये 40 ते 60 किमी अंतर पार केल्याचं ही संस्था म्हणते.
एक टोळकिडा किती नुकसान करु शकतो?
एक प्रौढ टोळधाड स्वतःच्या वजनाइतकं म्हणजे साधारण 2 ग्राम अन्न दररोज खाऊ शकते.
स्रोतः FAO
टोळधाडीमुळे धान्य उत्पादन घसरू शकतं असं प्रादेशिक सरकारचं म्हणणं आहे. पूर आणि दुष्काळग्रस्त भागात या नव्या संकटाची भर पडू शकते. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार या संकटाचा 2 कोटी लोकांवर परिणाम होऊ शकतो.
FAO चे वरिष्ठ अधिकारी क्रिथ क्रेसमन म्हणतात, "आम्हाला केनिया आणि इथिओपियाची जास्त चिंता वाटते कारण या देशांमध्ये टोळधाडींचा आकार मोठा आहे."
"इथिओपियामध्येही टोळांचं प्रजनन सुरु आहे त्यामुळे टोळांची संख्या वाढत आहे "
ईशान्य केनियामध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे 68 वर्षीय अली बिला वाको यांना यंदा पिक चांगलं येईल असं वाटत होतं.
मात्र टोळधाडीनं त्यांचं पीक नष्ट केलं.
'टोळधाडीनं माझं बहुतांश पीक संपवलं आणि जे वाचलं ते सुकून गेलं. मी माझ्या डोळ्यांनी पीक पाहिलं होतं पण ते कामाला आलं नाही हे बघून दुःख होतं"
1960 साली टोळकिड्यांनी असाच हल्ला केला होता असं वाको सांगतात.
ते म्हणतात," टोळांची संख्या इतकी वाढते की सगळं आकाश काळं होऊन जातं. सूर्यसुद्धा दिसत नाही."
बिघडलेल्या हवामानामुळे टोळधाडीचं संकट वाढलं आहे.
2018-19मध्ये झालेला पाऊस आणि चक्रीवादळं हे या टोळधाडीमागचं कारण आहे.
वाळवंटी टोळ साधारणपणे पश्चिम आफ्रिका आणि भारताच्यामध्ये 1.6 कोटी चौकिमी प्रदेशात राहातात.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार दक्षिण अरेबियन द्वीपकल्पात आधी पावसामुळे आणि नंतर पोषक वातावरणामुळे टोळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
टोळांची ही संख्या 2018पासून वाढत आहे.
2019मध्ये पहिली टोळधाड येमेन आणि सौदी अरेबियापासून इराणमार्गे पूर्व आफ्रिकेपर्यंत पोहोचली.
गेल्या वर्ष अखेरीस नवी टोळधाड केनिया, जिबूती आणि इरिट्रिआपर्यंत पोहोचली होती.
FAO चे अधिकारी क्रेसमेन यांच्या म्हणण्यानुसार या टोळधाडीला तोंड देणं अवघड आहे. कारण ही टोळधाड मोठ्या प्रदेशात पसरली आहे. मात्र आधी त्यांचा मुकाबला केला जाऊ शकत होता.
ते म्हणताात, "जर काही देशांनी टोळधाडी नियंत्रित करण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले असते तर हे संकट इतकं गंभीर झालं नसतं"
लोक टोळधाड नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हॉर्न ऑफ आफ्रिकेत टोळधाडीचा वाढलेला आकार पाहाता काही देशांनी त्यांना नियंत्रित करण्यासाठी पावलं उचलायला सुरु केली आहेत.
हे संकट थांबवणं निगराणी आणि योग्य नियंत्रणावर अवलंबून असतं.
FAO द्वारे चालवली जाणारी डेझर्ट लोकस्ट इन्फर्मेशन सर्विस टोळधाडी संदर्भातील सूचना, अंदाज, त्यांचे सध्याचे स्थान आणि त्यांच्या प्रजननासंदर्भातील माहिती देते.
परंतु टोळांची संख्या भरपूर वाढल्यामुळे हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशात आणीबाणी स्तरावर पावलं उचलली पाहिजेत. टोळांची संख्या कमी करण्यासाठी, त्यांचं प्रजनन थांबवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
टोळधाडीवर कसं नियंत्रण आणलं जाऊ शकतं?
स्रोतः FAO
अर्थात या संकटावर मात करण्यासाठी उपायसुद्धा पर्यावरणपूरक असण्याची गरज आहे. त्यामध्ये जैविक आणि नैसर्गिक शिकारींचा समावेश आहे. पण साधारणपणे किटकनाशक फवारुन त्यांच्याशी मुकाबला केला जातो.
हँडपंप, गाड्या आणि विमानांच्या मदतीने कमीतकमी वेळेत टोळांना मारता येऊ शकतं.
क्रिसमेन म्हणतात," केनिया, इथिओपिया आणि सोमालियामध्येसुद्धा विमानातून किटकनाशक फवारलं जाण्याची शक्यता आहे. परंतु सुरक्षा व्यवस्थेमुळे ते शक्य नाही"
"यातले टोळ प्रजननक्षम अवस्थेत पोहोचल्यामुळे त्यांच्यावर विमानातून फवारणी करण्याची गरज आहे. त्यामुळे आपण प्रजननक्षम टोळांची संख्या कमी करु शकतो."
ज्या देशांनी गेल्या अनेक दशकांमध्ये टोळांचा सामना केला नव्हता अशा देशांना या टोळांशी लढण्यात अडथळे येत आहेत. कारण या देशांमध्ये टोळांशी कसं लढावं यासाठी व्यवस्था उपलब्ध नाही.
सोमालिया, इथिओपिया, केनिया आणि पाकिस्तानात टोळ नियंत्रित आणण्यासाठी जी पावलं उचलली जातील त्यावरुन पुढे काय होईल हे ठरेल. जर त्यांची संख्या वाढत गेली आणि ते एका देशातून दुसऱ्या देशात जात राहिले तर ते एक संकट होते.
केनियातले शेतकरी अली बिला वाको यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आता काहीही करण्यास उशीर झाला आहे असे वाटते. सध्या टोळांना पळवून लावण्यासाठी मोठमोठा आवाज निर्माण करत आहेत.
परंतु तरीही या संकटाकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी तत्वज्ञानी आहे.
ते म्हणतात, "ही देवाची इच्छा आहे आणि हे त्याचंच सैन्य आहे."
लेखन आणि प्रॉडक्शन- लूसी रोजर्स, फिल्म-जोइ इनवुड, डिझाइन- जोइ बार्थोलोमेव आणि मिलि वाछीरा, डेव्हलपमेन्ट- बेकी रश, कॅट्रिओना मॉरिसन आणि पुरिटी बिरीर, टोळधाडीचे फोटो- स्विडबर्ट आर ओट्ट आणि स्टीफन रॉजर्स तसेच Getty Images.