अदानी विरुद्ध हिंडनबर्ग रिसर्च: SBI, LICमधले पैसे सुरक्षित आहेत ना? सोपी गोष्ट 787
खरंतर हे सगळं सुरू झालं साधारण साधारण 10 दिवसांपूर्वी. गौतम अदानी त्यांच्या कंपनीसाठी अतिरिक्त गुंतवणूक मिळवण्यासाठी काही शेअर्स बाजारात विक्रीसाठी खुले करणार होते, याला म्हणतात FPO अर्थात Follow-on Public Offering.
तो FPO येण्याच्या दोन दिवस आधीच अमेरिकेतली वित्तीय विश्लेषण संस्था हिंडनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रकाशित केला, ज्यात काही मोठे आरोप करण्यात आले.
त्यानंतर दहा दिवसात गौतम अदानी जगातल्या सर्वांत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरून 15व्या क्रमांकावर घसरलेत. त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य गेल्या 10 दिवसांमध्ये 100 अब्ज डॉलर्सपर्यंत गडगडलंय.
नेमकं काय घडलं की इतकी वाताहत झालीय? याचा तुमच्या-आमच्यावर काही परिणाम होतोय का?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - गुलशनकुमार वनकर, दिनेश उप्रेती
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)