You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोल : अरुंद गल्लीत लाखो लोकांची पार्टी, 151 लोकांचा गुदमरून मृत्यू
दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे शनिवारी (29 ऑक्टोबर) हॅलोविनचा सण साजरा करत असताना जमलेल्या गर्दीमुळे गुदमरून मृत्यू अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये बहुतांश तरुण आणि किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर हजारो जण बेपत्ता असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मृतांमध्ये 19 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी तीन जण हे चीनचे नागरिक असल्याचे शिनुआ वृत्तसंस्थेनी म्हटले आहे.
काही जणांचा चेंगराचेंगरीमुळे, तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गर्दीमुळे काही जणांना कार्डिॲक अरेस्टही झाल्याचे काल म्हटले गेले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)