You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋतुजा लटके म्हणतात, 'मी उद्धव ठाकरेंसोबतच, मशालीवरच निवडणूक लढवणार'
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक आपण लढवणार ती मशाल चिन्हावरच, असं ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं.
महानगरपालिका कार्यालयात आयुक्तांना भेटण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की माझ्यावर दबाव आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटले नाही. आमची निष्ठा उद्धव साहेबांबरोबच आहे. माझे पती होते त्यांची निष्ठाही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबरोबरच होती", असं त्यांनी सांगितलं.
यानंतर निर्माण झालेल्या घडामोडींचा बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी आढावा घेतला.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)