नदीत बोट बुडाल्यानंतर प्रवासीही बुडू लागले आणि...
Published
नदीत बोट उलटल्यानंतर हे प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडतायत.
आसाममधल्या धुबरी जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीत हा बोट उलटल्याचा अपघात घडला. 29 सप्टेंबरच्या सकाळी ही दुर्घटना घडली. या बोटीतून जवळपास 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली.
घटनास्थळी पोलिसांसह आपत्ती निवारण पथकाचे लोक पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. बोटीतल्या काही प्रवाशांना वाचवलं गेलं असलं तरी काही प्रवासी अजून बेपत्ता आहेत.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)