किंग कोब्रा सापासोबत तुमचा आमना-सामना झालाय का?

Published

किंग कोब्रा अचानक समोर आला की अनेकांना घाम फुटतो.

विषारी सापांमधला आकाराने मोठा आणि तितकाच मोठा हा साप भारताच्या पूर्व घाटांमध्ये प्रामुख्याने आढळतो.

आंध्र प्रदेशात ईस्टर्न घाट्स वाईल्डलाईफ सोसायटी किंग कोब्रा सापांच्या संवर्धनासाठी आणि त्यांचा आधिवास जपण्याचं काम करते.

दुसऱ्यांपासून भीती वाटली की किंग कोब्रा त्याचा फणा उगारतो. हा फणा तो जवळपास 3 – 4 फूट उंचीपर्यंत उगारू शकतो. यामुळे आपण माणसं त्याला घाबरतो. पण, मुळात किंग कोब्राच माणसांना घाबरतो. ते खूपच घाबरट असतात. माणसांना ते नेहमी टाळायला बघतात. हा विषारी साप असून विषारी सापांमध्ये तो सगळ्यांत मोठा आहे.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)