'आता शेतकरी महिला स्वतः माल विकू शकतात आणि तिच्या कष्टाचं मोल तिला मिळतंय'

Published

उच्चशिक्षित पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे- महल्ले यांनी शहरातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि गावाकडचा रस्ता धरला. लहानपणापासून त्यांनी घरातलं शेतकरी आई-बापाचं दुःख जवळून पाहिलं होतं.

दिवसभर शेतात राबून हातात कवडीमोल भाव आलेला पाहून त्यांच्या डोळ्यातलं पाणी पंकज आणि श्वेता दोघंही कधी विसरले नाहीत. शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून झालेली यवतमाळची ओळखही त्यांना अस्वस्थ करायची. ही ओळख पुसून काढण्यासाठी त्यांनी गावाकडे परतायचं ठरवलं. त्यातूनच ग्रामहितची सुरूवात झाली.

रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- आशिष मेश्राम, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)