प्रमोद महाजन यांना हत्येपूर्वी आलेला तो मेसेज हत्येचा संकेत होता? गोष्ट राजकीय हत्यांची

व्हीडिओ कॅप्शन, प्रमोद महाजन यांना हत्येपूर्वी आलेला तो मेसेज हत्येचा संकेत होता? गोष्ट राजकीय हत्यांची
Published

22 एप्रिल 2006 चा दिवस उजाडला एका गोळीबाराच्या सुन्न करणाऱ्या घटनेनं. संपूर्ण भारताला हादरवणारा हा गोळीबार झाला दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत. कारण या गोळीबारात जखमी झाले होते भाजपचे नेते प्रमोद महाजन.

गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी 3 मे 2006 रोजी अखेरचा श्वास घेतला.

पण त्यांची हत्या केली होती त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी. त्यांनी या हत्येचं कारण मात्र कधी सांगितलं नाही. काय होती ही घटना?

पाहा 'गोष्ट राजकीय हत्यांची' मालिकेचा दुसरा भाग.

गोष्ट - मयांक भागवत

सादरीकरण आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)