बैलपोळ्याच्या बैल मिरवायला आणले म्हणून मेहरगावच्या दलितांना मारहाण?

Published

बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला धुळ्याच्या मेहरगाव इथे दलित तरुणांना बैलपोळा मिरवणुकीत आपले बैल मिरवण्यासाठी आणले म्हणून मज्जाव करण्यात आला आणि मारहाण झाली असा गावातील काही सवर्ण व्यक्तींवर कथित आरोप आहे.

या वादाला दलित-संवर्ण असे स्वरुप प्राप्त झालंय. या प्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणार्‍या व्यक्तींविरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मिरवणुकीत बैल आणणार्‍या दलित तरुणांविरुद्ध आयपीसी 395 अंतर्गत गुंन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून याचा तपास सुरू असल्याचं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितलं आहे.

बीबीसी मराठीसाठी प्रवीण ठाकरे यांचा रिपोर्ट

हेही नक्की पाहा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)