You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कार चोरली लंडनमध्ये, सापडली पाकिस्तानात असं कसं?
चोरांचा तपास लावण्यासाठी पोलीस कानाकोपऱ्यात पोहोचतात हे आपण ऐकलंय. पण समजा चोरीला गेलेली गाडी शोधण्यासाठी साता समुद्रापार जायची वेळ आली तर?
पाकिस्तानच्या कस्टम्स अधिकाऱ्यांनी 30 ऑगस्टला कराची शहरातल्या डीएच भागात एका गाडीचा शोध सुरू केला. एका परकीय गुप्तहेर यंत्रणेच्या सांगण्यावरून त्यांनी हा शोध सुरू केला.
धक्का देणारी गोष्ट ही की ही गाडी चक्क लंडनमध्ये चोरीला गेली होती. ही गाडी पण साधीसुधी नाहीय बरं का, ही बेंटले मल्सीन व्ही 8 ऑटोमॅटिक कार आहे. याची किंमत साधारण 30 कोटींपेक्षा जास्त असेल असं पाकिस्तानी कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलंय. याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)