सायरस मिस्त्रींचा उद्योग जगातील प्रवास कसा होता?

व्हीडिओ कॅप्शन, सायरस मिस्त्रींचा उद्योग जगातील प्रवास कसा होता?
Published

शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात निधन झालं आहे.

पालघरमधील कासा पोलीस ठाण्यानं सायरस मिस्त्रींच्या निधनाची माहिती दिली. सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमधून गुजरातमधील अहमदाबादमधून मुंबईकडे येत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

कार दुभाजकाला धडकल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली. कारमध्ये एकूण चारजण होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)