महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन यंदा कोणत्या मुद्द्यांवरून गाजलं
पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार हा सामना सभागृहात आणि बाहेरही रंगलेला दिसला.
विधानसभेत चक्क शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंनी उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले. एकनाथ शिंदेंनीही किस्से आणि कविता सांगून सभागृहात फटकेबाजी केली. त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका फोनचा किस्सा सांगत अजित पवारांना टोमणे मारले.
विरोधक आमदारांच्या ’50 खोके, एकदम ओके’च्या घोषणाही चर्चेत राहिल्या. मात्र, या घोषणांवरून चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सभागृहात इशाराही दिला. तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाची कामं रद्द केल्याने अजित पवारांनीही टोमणे मारले.
विधानपरिषदेतही फडणवीस विरुद्ध खडसे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी टोले लगावले. आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याच्या मागणीचाही त्यांनी सभागृहाबाहेर समाचार घेतला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)