सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? असं अजित पवारांनी कुणाला विचारलं?
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यान्ह भोजन योजना राबवणाऱ्या संस्थेच्या केंद्रात जाऊन तिथल्या अन्नाची पाहणी केली. यावेळी अन्नाचा दर्जा खराब असल्याचं सांगत त्यांनी तिथल्या मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या या कृत्याबद्दल अनेकांनी टीकाही केली.
तर, मुंबईतले शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचाही एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यांनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे गटाबाबत बोलताना आक्षेपार्ह विधान केलं. हे प्रकार शिंदे – फडणवीसांना पटतायत का? हा सवाल अजित पवारांनी केला. याप्रकारावर एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे आता पाहावं लागेल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)