‘या’ शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक

Published

पंजाबमधल्या एका माध्यमिक शाळेत चक्क एकच शिक्षक आणि एक विद्यार्थी आहे. खरंतर सहा वर्षांपूर्वी इथं चाळीस विद्यार्थी आणि सहा शिक्षक होते. पण, हळू हळू शिक्षकांनी काही कारणांनी बदल्या करून घेतल्या. आणि शिक्षकच नाहीत म्हटल्यावर मुलांची संख्याही कमी होत गेली. पण, या गोष्टीचा फटका गावातल्या मुलींना बसतोय. कारण, शिक्षण सुरू ठेवायचं असेल तर त्यांना गावापासून काही किलोमीटर लांब शाळांमध्ये जावं लागतंय. आणि पालकांसाठी हा काळजीचा विषय बनलाय.

रिपोर्ट - प्रदीप पंडित

एडिट - राजन पपनेजा

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)