'माझ्या मुलींना इन्सुलिन मिळालं नाही तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो'

व्हीडिओ कॅप्शन, 'माझ्या मुलींना इन्सुलिन मिळालं नाही तर ते त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो'
Published

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीच्या गव्हे गावचे सुजीत पवार दर महिन्याआड आपल्या दोन मुलींचा जीव वाचवण्याठी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये येतात.

रिया आणि पलक या त्यांच्या दोन मुली गेल्या 10 वर्षांपासून टाईप-1 मधुमेहाने ग्रस्त आहेत. इन्सुलिनशिवाय जगू शकणार नाहीत, अशी परिस्थिती.

जिल्हा, तालुक्याच्या सरकारी रुग्णालयात टाईप-1 रुग्णांना इन्सुलिन मिळत नाही. ते मुंबईतून इन्सुलिन घेतात आणि दापोलीकडे परतीच्या प्रवासाला लगेच सुरूवात करतात.

रिपोर्ट- मयांक भागवत

शूट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- शरद बढे

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)