वीजेचं बील थकलं म्हणून विहिरीचं पाणी प्यायले आणि 4 जणांनी जीव गमावला

व्हीडिओ कॅप्शन, वीजेचं बील थकलं म्हणून 'या' विहिरीचं पाणी पिऊन 4 गावकऱ्यांना जीव गमवावा लागला.
Published

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात विहिरीतलं दूषित पाणी प्यायल्याने 4 जणांचा मृत्यू झाल्यांचं समोर आलंय.

पाचडोंगरी आणि कोयलारी या दोन्ही गावामध्ये साथीच्या आजाराचे जवळपास 400 रुग्णं आढळून आले आहेत. यापैकी जवळपास 100 रुग्णांवर चुरनी, काठकुंभ, अचलपूर, अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.

मात्र परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही आणि लक्षणांवरून ही कॉलराची साथ असल्याचं चुरणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदेव वर्मा यांनी सांगितलं.

रिपोर्ट- नितेश राऊत

शूट- सागर तायडे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)