आमदार निवासातील शहाजीबापू पाटलांच्या खोलीचं छत कसं कोसळलं?

व्हीडिओ कॅप्शन, शहाजीबापू पाटील यांच्या मुंबईतल्या आमदार निवासाचं छत अचानक कसं कोसळलं?
Published

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय' या वाक्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

त्यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीत बुधवारी (6 जुलै) मध्यरात्री मोठा अपघात झाला. मुंबईतली सर्व कामं आटोपून शहाजीबापू पाटील रात्री उशीरा त्यांच्या खोलीवर पोहोचले. पण, त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांच्या खोलीचं छप्पर खाली कोसळलं.

महत्त्वाचं म्हणजे हे छप्पर शहाजीपाबू यांच्या बेडवरच कोसळलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)