ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या महिमा चौधरी रडत रडत काय म्हणाल्या?
Published
परदेस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणाऱ्या महिमा चौधरी सध्या कॅन्सरशी लढा देतायत.
अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवरून एका व्हीडिओद्वारे ही माहिती दिलीये. अनुपम खेर यांनी एका प्रोजेक्टमध्ये काम करायला त्यांना बोलावलं आणि मग महिमा चौधरींनी त्यांना आपल्या आजाराची माहिती दिली. हे सगळं सांगताना महिमा चौधरी भावूक झाली.