Metaverse Banking: तुमची भविष्यातील बँक ‘अशी’ असेल
Published
गेमिंग आणि क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये मेटाव्हर्सचा अनुभव नवीन नाहीए. पण, आता बँकिंगही हायटेक होणार आहे. म्हणजे मेटाव्हर्स बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या ‘आभासी देही, आभासी डोळा’ बँकिंगचा अनुभव घेऊ शकाल. खासकरून उद्योगासाठीचं कर्ज, पैशाची देवाण घेवाण ही कामं बँकेत गेल्याशिवाय होऊ शकत नाहीत.
पण, मेटाव्हर्स बँकिंगमध्ये ही सगळी कामं ऑनलाईन करणं शक्य होणार आहे. मोबाईल अॅप ऐवजी थेट बँकेतील कर्मचाऱ्यांशी बोलण्याची सोय असल्यामुळे कामाची सुलभताही आहे. आपणही पाहूया भविष्यातली ही बँक कशी असणार आहे.
रिपोर्ट - ऋजुता लुकतुके
रिपोर्टिंग सहाय्य - प्राजक्ता पोळ
शूट सहाय्य - शार्दूल कदम
एडिट - शरद बढे