5 वर्षांचा चिमुकला जेव्हा ताशी 50 किमी वेगाने घोडेस्वारी करतो
Published
केवळ 5 वर्षांच्या या चिमुकल्याचं नाव जोशिथ छत्रपती आहे. तो सध्या अंगणवाडीत शिकतो. पण तो घोड्यावर बसतो तेव्हा तो ताशी 40 ते 50 किमी वेगाने घोडा पळवतो.
जोशिथ हा आंध्र प्रदेशमधील तिम्मापुरम येथे राहतो. गावाजवळच्या किनाऱ्यावर जेव्हा तो टोपी घालून घोडा फिरवतो तेव्हा अनेकजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात.