जागतिक पर्यावरण दिन: 'हे' पुणेकर तुकाई टेकडीवर वाढदिवस आणि स्मृतीदिनाला एक झाड का लावतात?
पुण्यातल्या बाणेरमधील तुकाई टेकडी एकेकाळी ओसाड होती. या टेकडीशी स्थानिक रहिवाशांचं नातं जुळलं आणि तिथे एका बायोडायव्हर्सिटीने जन्म घेतला. बघता बघता या टेकडीने बाळसं धरलं.
आज औषधी वनस्पतींसह इतर चाळीस प्रजातींच्या झाडांना ही तुकाई टेकडी अंगाखांद्यावर खेळवतेय.
तुकाई टेकडीवर अशी वेगवेगळ्या प्रजातीची हजारो झाडं आहेत. स्मृतींचं प्रतीक म्हणून टेकडीवर रूजवली गेली आहेत.
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जवळच्या व्यक्तीचा किंवा पाळीव प्राण्याचा मृत्यू, अविस्मरणीय क्षण अशा अनेक प्रसंगाच्या निमित्ताने इथे वृक्षारोपण केलं जातं.
रिपोर्ट- मानसी देशपांडे,
शूट- नितीन नगरकर,
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले,
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)