दलित पँथर : 'देशातल्या ब्राम्हणवादी लोकांनी कब्जा केलेल्या दलितांच्या जमिनी माघारी घ्या'
1972 साली मुंबईत स्थापन झालेल्या दलित पँथरला आता 50 वर्षं पूर्ण होतायत. त्यानिमित्त महाराष्ट्रात नांदेडमध्ये दलित-ब्लॅक पँथर चळवळीच्या अभ्यासकांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसीय परिषद आयोजित केली होती.
त्यावेळी दलित पँथर चळवळीचे सहसंस्थापक ज.वि. पवार, हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. सुरज येंगडे आणि अमेरिकेतील ब्लॅक पँथरचे अभ्यासक यांच्यासहीत देशभरातील अनेकांनी सहभाग घेतला.
त्यावेळी दलितांनी आरक्षणाऐवजी देशातल्या ब्राम्हणवादी लोकांकडून जमिनी माघारी घेण्यासाठी लढा द्यायला पाहिजे असं डॉ सुरज येंगडे यांनी वक्तव्य केलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)