‘इथं’ हजारो गरजूंना दिलं जातं मोफत आणि चवदार, पोषक जेवण
Published
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मयूर कामदार या तरुणाने गरीब आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी फिरती मंजुबा नू रसोई या नावाने फिरती रसोई सुरू केली आहे.
या माध्यमातून रोज साधारण हजार लोकांना ते दुपारी आणि रात्री चवदार, पोषक आणि स्वच्छ आहार देतात. आपल्या मृत आईच्या इच्छेचा मान ठेवून त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय.
जाणून घेऊया या मंजुबा नू रसोईबद्दल…