राज्यात मान्सून कधी येईल?
Published
मान्सूनपूर्व सरींनी सध्या महाराष्ट्र ओलाचिंब झालाय. मात्र, प्रत्यक्ष मान्सून राज्यात कधी पोहोचेल? हा प्रश्न सगळ्यांना सतावतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी आणि शेतीची कामं कधी सुरू करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांच्याशी पुण्याहून बीबीसी मराठीसाठी मानसी देशपांडे यांनी बातचीत केली.