‘जिराफाचं पिल्लू आपल्या पायावर उभं राहिलं तेव्हा...
Published
अमेरिकेच्या सॅन दिएगो प्राणी संग्रहालयात मिसितुनी नावाच्या 3 महिन्यांच्या जिराफाच्या पिलाचा पाय अधू झाला होता. तिथले पशूवैद्यकतज्ज्ञ आणि अस्थिरोगतज्ज्ञ यांनी एकत्र येऊन तिच्यासाठी खास पट्टा बनवला. आणि त्याच्या मदतीने हे पिलू पुन्हा चालायला लागलं. आणि आपल्या कळपात पुन्हा मिसळलं.