आंबाः हवामानातील बदलांमुळे आंब्याचं उत्पादनही कमी झालं आणि चवही बिघडली

व्हीडिओ कॅप्शन, हवामानातील बदलांमुळे आंब्याचं उत्पादनही कमी झालं आणि चवही बिघडली
Published

हवामान बदलांबद्दल हल्ली आपण वारंवार बोलतो. शेतीचं त्यामुळे नुकसान होताना पाहतोय. शेती बरोबरच फळ बागायतीचंही तीव्र हवामानामुळे नुकसान होतंय. फळांचा राजा आंबा या हंगामात फारसा खायला मिळाला नाही. याचंही कारण हवामानातले बदल हेच आहे. कारण, एकतर आंब्याचं उत्पादन कमी झालं. आणि फळाची चवही नेहमीसारखी नव्हती. असं का हा प्रश्न बीबीसीने काही फळ बागायतदार आणि तज्ज्ञांना विचारलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)