विशाखा सुभेदार महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याबद्दल नेमकं काय म्हणाली?
स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार मंचावर आली की हास्याचे कारंजे फुटतात. फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या शोजमधून तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
मात्र आता तिने करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने हा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे. तिचा हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय आणि पुढील वाटचाल या विषयांवर विशाखा सुभेदारशी संवाद साधलाय बीबीसी मराठीची प्रतिनिधी विशाखा निकमने. पाहा विशाखा सुभेदार हास्यजत्रा सोडण्याबद्दल नेमकं काय म्हणाली?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)