ग्रामीण भागात बिझनेस कसा करावा ते या महिलांकडून शिकावं

व्हीडिओ कॅप्शन, ग्रामीण भागात बिझनेस कसा करावा ते या महिलांकडून शिकावं
Published

बीडच्या आष्टी तालुक्यातील कानडी खूर्द गावामध्ये महिलांचं जीवन बचतगटामुळं पूर्णपणे बदललंय. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाच्या उमेद अभियानांतर्गत नोव्हेंबर 2017 ला या गावात 8 बचतगट तयार करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक महिलाच्या पुढाकारातून अजून 6 गट तयार करण्यात आले.

या 14 बचतगटांच्या माध्यमातून इथल्या महिला उद्योजक बनल्या आहेत. तर एकल महिलांना या बचतगटाच्या माध्यमातून जगण्याची नवी उमेद मिळालीये. कधी काळी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणाऱ्या या महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून दुध डेअरी, शेळीपालन, पीठाची गिरणी, शिलाईकाम, चिक्की बनवणे, किराणा दुकान असे अनेक व्यवसाय सुरू केले आहेत.

या व्यवसायामुळे इथल्या महिलांमधील आत्मविश्वासही वाढला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)