राष्ट्रीय विज्ञान दिवस : विज्ञान, गणित जेव्हा खेळातून शिकता येतं

Published

विज्ञानाच्या कठिण संकल्पना खेळाचा वापर करून समजावणाऱ्या अरविंद गुप्तांना विज्ञानातील खेळण्यांचा जादूगार म्हटलं जातं. गेली तीन दशकं ते खेळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

त्यांना विज्ञानातल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले अनेक तरूण आज विज्ञानाचा प्रसार करतायत. शिवाजी माने या तरूणाने हा खेळांचा वारसा पुढे नेण्याचं काम केलंय. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान खेळण्यांविषयी जाणून घेऊया.

सी व्ही रामन यांना भौतिकशास्त्रातील प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. त्या दिवसाच्या सन्मानार्थ भारतात 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा केला जातो. त्या दिवशी भारतातल्या विज्ञानाशी संबंधित संस्था भेटीसाठी खुल्या असतात.

रिपोर्ट आणि शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)