महाराष्ट्र हवामान बातमी: अवकाळी पावसाचा या जिल्ह्यांना बसणार फटका

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र हवामान बातमी: अवकाळी पावसाचा या जिल्ह्यांना बसणार फटका
Published

महाराष्ट्राला 19 आणि 20 फेब्रुवारी हे पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे हवामन विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार मराठावाडा, विदर्भातल्या जिल्ह्यांना याचा फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना आता रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह मध्य आणि पूर्व भारत दोन्ही भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये 20-21 फेब्रुवारीला पाऊस पडेल.

ISWOTY

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)