बप्पी लाहिरी यांना मराठी सिनेमात गायला 43 वर्षं लागली, कारण...

व्हीडिओ कॅप्शन, बप्पी लाहिरी यांना मराठी सिनेमात गायला 43 वर्षं लागली, कारण...
Published

हिंदी सिनेसृष्टीतली ज्येष्ठ गायक - संगीतकार बप्पी लाहिरी यांचं मुंबईतल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते 69 वर्षांचे होते.

आलोकेश लाहिडी असं त्यांचं नाव असून त्यांना सगळे बप्पी लहरी या नावानं ओळखत होते. बप्पीदा नावानं प्रसिद्ध असलेल्या लाहरी यांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळंही वेगळी ओळख मिळाली होती.

वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं.

ISWOTY

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)