You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ही महिला फोटोग्राफर शाळा शिकली नाही, पण..
सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या फारच कमी महिला फोटोग्राफर आहेत, त्यापैकी एक आहेत नाशिकच्या सुमित्रा जाधव.
सुमित्रा इच्छा असूनही फारशा शिकू शकल्या नाहीत. त्या फोटोग्राफीच्या क्षेत्रातही अपघातानेच आल्या. त्याचे पती पर्यटकांचे फोटो काढायचे. पण त्यांचे सासरे आजारी पडल्यानंतर त्यांच्या पतीला गावी जावं लागलं. आर्थिक चणचण, त्यात व्यवसाय बंद, अशा परिस्थितीत घर चालवायला म्हणून त्यांनी कॅमेरा उचलला. त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे. इंस्टाग्राम, सेल्फी, रिल्सच्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना आता फोटो एडिटिंग, व्हीडिओ शुटिंग शिकायचं आहे. सध्या त्या याच प्रयत्नात आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)