आंतरराष्ट्रीय निधी बंद झाला तर अफगाण महिलांना न्याय मिळणार का?

व्हीडिओ कॅप्शन, आंतराष्ट्रीय निधी बंद झाला तर अफगाण महिलांना न्याय मिळणार का?
Published

संयुक्त राष्ट्रांच्या मते अफगाणिस्तानातील 80 टक्क्यांहून अधिक महिलांना शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक हिंसेला तोंड द्यावं लागतं.

तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर तीन कोटी चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानात पीडित महिलांसाठी केवळ 24 आधारकेंद्र आहेत. ही केंद्रं चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून निधी मिळतोय. पण सध्या देशात चाललेल्या आर्थिक संकटामुळे हा निधीही बंद होईल की काय अशी भीती स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतेय. बीबीसी पश्तोच्या प्रतिनिधी शाझिया संगरवाल यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )