सावित्रीबाई फुले - फातिमाबी यांच्या नावाचं मुलींसाठीचं मैदान कसं सुरू झालं?
भारतातील सर्वात मोठी घेट्टो मुस्लीम वस्ती असणाऱ्या मुंब्रा या भागातल्या अनेक मुली फुटबॉलच्या माध्यमातून स्वप्न पाहतायत. त्यांच्यापैकीच एक मंतशा सांगते की, "पुर्वी आम्ही बुरखा घातल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हतो. अगदी फुटबॉल खेळायलाही आम्ही बुरख्यामध्ये किंवा स्कार्फ यायचो." त्यांचा हा आत्मविश्वास वाढवण्याचं काम परचम ही संस्था करतेय. त्यांच्याच प्रयत्नातून फातिमाबी-सावित्रीबाई मैदान सुरू झालंय. इथे सोयी सुविधा नाहीत पण मुलींची जिद्द आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)