चंद्रपूरमधील नागरिकांना अस्थमा, न्यूमोनिया यांसारखे आजार का होतायत?
घनदाट जंगल आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध असं चंद्रपूर शहर आणि परिसरातील नागरिक काही भाग प्रदुषणामुळे त्रस्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाच्या खाणी, औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, सिमेंट कंपन्या, लोह खनिज कंपन्या आणि पेपर मिल्स आहेत.
या प्रकल्पात अहोरात्र जाळल्या जाणाऱ्या कोळशातून निघणारा धूर वातावरणात सोडला जातो. शिवाय कोळशाची राखही शिल्लक राहते.
या धूरामुळे आणि राखेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे आजार होत आहेत. बीबीसी मराठीसाठी प्रवीण मुधोळकर यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)