Long Covid : सात महिन्यांच्या संघर्षानंतर 'या' महिलेने केली कोरोनावर मात मात
कोव्हिड-19च्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली. देशभरात कुठे बेड उपलब्ध नव्हते, कुठे ऑक्सिजन तर कुठे औषधं. अशा परिस्थितीतही आपल्या जबरदस्त इच्छशक्तीने गुजरातच्या दाहोदमधल्या एका महिलेने सात महिने कोरोनाशी संघर्ष केला आणि अखेर त्यावर मातही केली.
गीताबेन धार्मिक यांचे पती सांगतात की उपचारादरम्यान खूप अनिश्चितता होती, खूप बऱ्या-वाईट गोष्टी कानी पडत होत्या. अशात डॉक्टरांच्या मेहनतीने तसंच मित्रपरिवाराच्या पाठबळाने ते त्यांच्या पत्नीला रुग्णालयातून घरी परत आणू शकले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)