एसटी ड्रायव्हरवर बांधकाम मजूर म्हणून काम करण्याची वेळ का आली?
Published
विजय खैरनार गेल्या 9 वर्षांपासून नाशिकच्या येवल्यात एसटी ड्रायव्हर म्हणून काम करतात. तुटपुंजा पगार, कर्जाचे हफ्ते आणि त्यात एसटी कामगारांचा संप सुरू झाल्यावर त्यांच्यावर मजूर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.
कोव्हिडच्या काळात एसटी बंद असताना त्यांनी मजुरी करूनच घर चालवलं. या परिस्थितीमुळे विजय यांच्या मुलीला धुणीभांडी करायला जावं लागतं तर मुलगा देखील मजुरी करायला जातो.