ओडिशामध्ये 'या' आजींनी रिक्षाचालकाला 1 कोटींची संपत्ती दिली
Published
65 वर्षांच्या एका आजींनी तब्बल 1 कोटींची संपत्ती रिक्षावाल्याच्या नावावर केली आहे. मिनाती पटनाईक या ओडिशामधील कट्टक येथे राहतात. तर बुद्ध समल असं या रिक्षावाल्या काकांचं नाव आहे.
ते गेल्या 25 वर्षांपासून पटनाईक कुटुंबियांची कामं करत होते. पती आणि मुलीच्या मृत्यूनंतर बुद्ध यांनी माझी काळजी घेतल्याने आपण हे संपत्ती त्यांना देत असल्याचं मिनाती सांगतात.