हवामान बदल: भारतासमोर कोळसा उत्सर्जनाखेरीज काय आव्हानं आहेत?
Published
कोळशाच्या मुद्द्यावर COP-26मध्ये हवामानविषयक करार होत असताना शेवटच्या क्षणी बदल सुचवल्यामुळे भारत आणि चीनला जोरदार टीकेला सामोरं जावं लागतंय.
कोळसा फेज आऊट ऐवजी फेज डाऊन असा भाषेचा आग्रह धरला गेला होता. आर्थिक विकासासाठी भारत मोठ्या प्रमाणात कोळशावर अवलंबून आहे. पण भारतासमोर हवामान बदलामुळे इतरही अनेक आव्हानं उभी आहेत.
बीबीसी प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांचा रिपोर्ट.