‘इथं’ तळ्याकाठी भरते जगावेगळी शाळा
Published
गुजरातच्या जामनगरमध्ये तळ्याच्या काठावर रोज पहाटे एक शिकवणी वर्ग भरतो. 49 वर्षीय रेखा नंदांच्या या वर्गाला वयोगटाचं बंधन नाही की विषयांचं.
कारण, झोपडपट्टीत राहणाऱ्या, भीक मागणाऱ्या आणि रस्त्यावर निरुद्देश फिरणाऱ्या मुलांनी शिकत राहावं, त्यांची शाळा सुटू नये यासाठी त्या हा वर्ग भरवतात. त्यासाठी त्यांनी कुठलीही सेवाभावी संस्था सुरू केलेली नाही.
जितकं आणि जसं जमेल तसं या मुलांना त्या शिकवतात. त्यासाठी लागणारा आर्थिक भारही त्या उचलतात. अशा या जगावेगळ्या शिकवणीला आपणही जाऊया...