You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं अशी मागणी का होतेय? #सोपीगोष्ट 462
गेली काही वर्ष राज्यातली परिवहन सेवा तोट्यात आहे. कोव्हिडच्या लॉकडाऊनचा एसटीलाही मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा बराच काळ एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशी संख्येत घट झालेली आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, पगारवाढ मिळावी, घरभाडं भत्ता आणि महागाई भत्ता वाढवावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.
त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण्याची घोषणा केली. पण एक कर्मचारी संघटना एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करतेय.
नेमकं काय होईल या विलीनीकरणाने ? आणि राजकीय पक्षांनी यावर काय भूमिका घेतली आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन, लेखन, निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)