सचिन कुमावत: अहिराणी हिरो आणि खान्देशी 'माधुरी दीक्षित'चा कॅसेट ते युट्यूबचा प्रवास
झिंगाटनंतर मराठी संगीत इतिहासात युट्यूबवरचं दुसरं सर्वांत हिट गाणं, म्हणजे 'बबल्या इकस केसावर फुगे'. या गाण्याला आजवर 24 कोटीहून जास्त हिट्स आहेत.
भाषा, कला, वारसा आणि मागणी या सगळ्यांचा संगम म्हणजे अहिराणी गाण्यांची इंडस्ट्री. आज प्रामुख्याने फक्त गाणी बनवणारी ही अहिराणी इंडस्ट्री आधी वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तयार करायची.
अहिराणी गाण्यांची अफाट प्रसिद्धी आणि युट्युबसारखा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे इथल्या प्रत्येकाला आपली कला आजमावून पाहायची आहे.
त्यामुळे इथे गावा-गावात युट्यूब चॅनेल काढणारे लोक आहेत. या दुनियेत सगळेच स्टार आहेत असं नाही, अजूनही उदरनिर्वाहासाठी कोणी रिक्षा चालवतं, कोणी पानटपरी चालवतं तर कोणी शेती करतं.
पण हे सगळे लोक एकत्र आले की त्यांच्या कलेच्या अभिव्यक्तीतून, कॅसेट, सीडी, युट्यूब या बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहातून भाषा नदीसारखी वाहात राहाते.
रिपोर्ट - अनघा पाठक
व्हीडिओ - मंगेश सोनवणे
एडिट - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)