You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हवामान बदलामुळे पूर, वणवा, भूस्खलन आता ‘न्यू नॉर्मल’ ठरणार - सोपी गोष्ट 459
तीव्र अशा उष्णतेच्या लाटा (हीटवेव्हज), विध्वंसकारी पूर आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल ठरणार आहेत, आपल्या जगण्याचाच एक भाग होणार आहेत असं जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे.
2021 मधली हवामान बदलाची स्थिती यासंबंधी जो एक रिपोर्ट प्रकाशित झालाय त्यात एका शब्दाला अधोरेखित केलंय – ‘आपल्या डोळ्यादेखत बदलणारी परिस्थिती.’
’द स्टेट ऑफ क्लायमेट’ असं नाव असणारा हा रिपोर्ट भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक दाखवतो. वाढतं तापमान, वाढती समुद्राची पातळी, अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती असं सगळं त्यात आहे.
COP26 परिषद लोकांसाठी आणि पृथ्वीसाठीही एक टर्निंग पॉईंट ठरायला हवी अशीच अपेक्षा अनेकांची आहे. पण आता त्यातून नेमकं काय साध्य होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पर्यावरणसंबंधी बातम्या, व्हीडिओ तसंच इतर विषयांसंबधी अपडेटेड बातम्या पाहाण्यासाठी बीबीसी मराठीच्या साईटला नक्की भेट द्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)