COP 26 Glasgow: एक उष्ण शहर थंड करू पाहणारा अवलिया...
हवामान बदलाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. त्यामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये आढळून आलं आहे की, गेल्या 40 वर्षांत जगातील बहुतांश भागात उष्ण दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे अनेक मोठी शहरे त्रस्त आहेत, त्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास आणि उष्माघाताचा सामना करावा लागत आहे.
मात्र पाकिस्तानमधली एक व्यक्ती या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना झाडे लावून शहरांमध्ये जंगले तयार करायची आहेत. बीबीसीच्या 'लाइफ @ 50 डिग्री सेल्सिअस' या विशेष मालिकेत फरहत जावेदची ही कथा पाहा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)