मुंबईत खड्ड्यांवरून महापौर किशोरी पेडणेकर स्टंटबाजी करत होत्या?

Published

गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेकडून रस्ते, त्यावरची डागडुजी यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण इतक्या वर्षांमध्ये मुंबई काही खड्डेमुक्त झाली नाही. यंदाही परिस्थिती जैसे थे आहे.

तीनच दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यांवरच्या खड्डे पहाणी दौरा केला यावेळी कुर्ल्याला पोहोचल्यावर ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे विचारणा केली.

यावेळी अधिकाऱ्यांनी हे खड्डे बुजवले होते, परंतु पावसामुळे पुन्हा खड्डे तयार झाल्याचं म्हटलं. त्यांनी त्याचे फोटो दाखवण्याचाही प्रयत्न केला. पण महापौरांनी एका अधिकाऱ्याच्या हातातून फाईल खेचत त्या अधिकार्‍यांला झापलं.

"चष्म्याचा नंबर वाढलाय का? खड्डे दिसत नाहीत? हे फेकून द्या" असं म्हणत त्या अधिकार्‍यांवर संतापल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)