REET: ब्लुटूथ कानात, सिम कार्ड चपलेत घातलेले कॉपीबहाद्दर असे पकडले

Published

राजस्थानमध्ये एका परीक्षेदरम्यान अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करू पाहणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राजस्थानच्या REET परीक्षेत अशी हायटेक कॉपी करताना हे तरुण पकडले गेले.

26 सप्टेंबरला राजस्थान प्राध्यापक पात्रता परीक्षा (REET) झाली. प्राध्यापक होण्यासाठी सुमारे 13 लाख परीक्षार्थी अनेक महिने अभ्यास करत होते. मात्र या शिक्षक भरती परीक्षेसाठी हे तरुण चपलेत सिम आणि कानात हे लहानसं यत्र लावायच्या तयारीत होते.

या रॅकेटची माहिती मिळताच पोलिसांनी राज्यातील अनेक केंद्रांवर परीक्षेपूर्वीच धाडी टाकत अशा अनेक कॉपीबहाद्दरांना ताब्यात घेतलं.

पाहा नेमकं काय घडलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)