You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिशिल्ड लशीला युकेमध्ये खरंच मान्यता नाही का?
कोव्हिशिल्ड लशीला युकेमध्येच मान्यता नाही का? कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस झाले असतील तर तुम्हाला युकेला प्रवास करता येईल का? आणि तिथे गेल्यानंतर दहा दिवस क्वारंटिन म्हणजे विलगीकरणात राहावं लागेल काय यावरून मागचे दोन दिवस गोंधळ सुरू आहे.
त्यावर मंगळवार - 22 सप्टेंबरला युके सरकारने ताजी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी म्हणजे प्रवासाचे नियम जारी केलेत. आणि त्यातून असं स्पष्ट होतं की, कोव्हिशिल्ड लशीला युकेमध्ये मान्यता आहे. त्यामुळे दोन डोस झाले असतील तर तुम्हाला भारतातून युकेला प्रवास करता येईल. पण, तिथे गेल्यावर दहा दिवसांचं क्वारंटिन आणि दुसऱ्या आणि दहाव्या दिवशी आरटीपीसीआर टेस्ट या चुकणार नाहीयत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)